बटेंगे तो कटेंगे… आपण जात धर्म भाषेच्या आधारावर विभागले जाऊ नये; गडकरींचा सरकारला घरचा अहेर

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज बटेंगे तो कटेगेच्या घोषणेवरून सरकारला घरचा अहेर दिला आहे. आपण जात धर्म, भाषेच्या आधारावर विभागाले जाऊ नये असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर एका टिव्ही चॅनेलच्या प्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, आपण जात, धर्म, भाषा व लिंग या आधारावर विभागाले जाऊ नये. आपण उलट संघटित झाले पाहिजे. योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेला भाजपमधून यापूर्वीच विरोध झाला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या घोषणेला हरकत घेतली आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानतो. मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही.