दापोली विधानसभा मतदारसंघात 875 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा अधिकार

दापोली विधानसभा क्षेत्रात गृह मतदानाची प्रक्रिया दिनांक 14 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पार पडली. दिव्यांग आणि 85 पेक्षा जास्त वय असलेले मतदारांना ही सुविधा उपलब्ध होती. दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण 930 मतदारांनी गृह मतदानाचा विकल्प निवडला होता. 930 मतदारांपैकी 113 दिव्यांग आणि 817 मतदार हे 85 पेक्षा जास्त वयाचे होते.
या मतदारांपैकी 110 दिव्यांग मतदारांनी आणि 85 पेक्षा जास्त वयाच्या 765 जेष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी 17 मतदार मयत असून 36 मतदार गृह भेटीदरम्यान विविध कारणांमुळे अनुपस्थितीत होते. 2 मतदारांनी मतदान करण्यास नकार दिला. सदर गृहभेटीचे मतदानासाठी 42 पथके तयार करण्यात आली होती. एकूण मतदानाची टक्केवारी 85.12% इतकी आहे.
आगामी 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणूकीत सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपला मतदानाचा हक्क आपल्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर जावून बजवावा, असे आवाहन दापोलीचे उप विभागीय अधिकारी  डॉ. अजित थोरबोले निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.