धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार पाडले, राहुल गांधी यांचा हल्ला

मुंबईतील धारावी येथील एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी एनडीए सरकारने आमचे महाराष्ट्रातील सरकार पाडले, आमदार खरेदी केले, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईत असलेली देशातील सर्वात महागडी जमीन मोदींना अदानींना द्यायची आहे, त्यासाठीच त्यांनी हा सगळा खटाटोप केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. महागामा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

भाजपला संविधान कचऱयात फेकायचेय

आरएसएस आणि भाजपला देशाचे संविधान कचऱयाच्या डब्यात फेकून द्यायचे असून इंडिया आघाडी संविधानाचे रक्षण करेल, असे सांगताना संविधान उंचावून याचा रंग महत्त्वाचा नाही तर त्यात लिहिलेला मजकूर महत्त्वाचा आहे. हे संविधानच तुम्हाला पाणी, जंगल आणि जमिनीचा अधिकार मिळवून देते, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

महापालिकेकडून शक्तिस्थळावर पुष्पांजली

शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून शक्तिस्थळावर पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. यामध्ये शोभिवंत झाडांसह विविध प्रकारची शेवंती, झेंडू, जरबेरा, पॉइंट सिटी आदी प्रकारची फुले लावून शक्तिस्थळ सजवण्यात आले आहे.