हरयाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एका डावात सर्व दहा फलंदाज बाद करण्याचा अर्थातच परफेक्ट टेनचा विक्रम रचला. केरळविरूद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. रणजी स्पर्धेत एका डावात 10 विकेट टिपणारा तो केवळ तिसरा फलंदाज ठरला. याआधी, 1956-57 मध्ये प्रेमांग्सू चॅटर्जी यांनी, तर 1985-86 मध्ये प्रदीप सुदरमन यांनी एकाच डावात 10 दहा टिपले आहेत.
हिंदुस्थानात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात 10 पैकी 10 फलंदाज बाद करण्याचा पराक्रम सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे आणि देबाशीष मोहंती यांनी केलेला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये जिम लेकर आणि अनिल कुंबळे या दोघांनाच परफेक्ट टेनचा पराक्रम शक्य झाला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट प्रचंड मोठे असल्यामुळे यात हा पराक्रम करणारे असंख्य गोलंदाज आहेत.
शुक्रवारी सकाळी सामना सुरू झाला तेव्हा, अंशुल कंबोजला दहा विकेटचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज बाद करण्याची गरज होती. त्याने तीन षटकांत 2 विकेट घेत परफेक्ट टेनचा दुर्मीळ किक्रम आपल्या नाकाकर केला. अंशुलने एकूण 30.1 षटकांत 9 निर्धाक षटकांसह 49 धाकांच्या मोबदल्यात हे सर्क 10 फलंदाज टिपले. केरळ संघात बाबा अपराजित, रोहन कन्नूमल, सचिन बेबी, जलाज सक्सेना अशा अनुभवी फलंदाजांचा समावेश होता. पण अंशुलच्या भेदक माऱ्यासमोर केरळच्या सर्कच फलंदाजांनी शरणागती पत्करली. केरळकडून रोहन कन्नूमल (55), अक्षय चंद्रन (59), मोहम्मद अझरुद्दीन (53) यांनी अर्धशतकी खेळी केली. केरळचा डाक 291 धाकात आटोपला. प्रत्युत्तरादाखल हरयाणाची उर्करित 61 षटकांच्या खेळात 7 बाद 139 अशी दुर्दशा झाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा निशांत सिंधू 29, तर जयंत यादव 1 धाकेकर खेळत होता.