मी भाजपमध्ये कुजलो आणि सडलोय असे विधान राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी फलटण येथे केले. मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. कोणालाही भीक घालत नाही. कोणी धमकी देत असेल, तर धमकीला धमकीनेच उत्तर देण्याची धमक माझ्याकडे आहे. भाजप मला नडले आता, तर जानकरही भाजपला नडल्याशिवाय राहणार नाही. फलटण-कोरेगाव मतदारसंघात रासपचे दिगंबर आगवणे हे उमेदवार आहेत.