हिटमॅनच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, रोहित आणि रितीका यांना पुत्ररत्नाचा लाभ

टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबईचा वंडर बॉय रोहित शर्माच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सजदेह यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 22 नोव्हेंबर पासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. संघातील सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. मात्र, रोहित शर्मा पत्नी रितीका गर्भवती असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. त्यामुळे पहिल्या कसोटीला तो मुकणार असल्याची चर्चा सोशल मीडियासह चाहत्यांमध्ये रंगली आहे. मात्र, शुक्रवारी (15-11-2024) त्याच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे आगमी बार्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.