कर्नाटकात एचआयव्ही संक्रमित रक्ताद्वारे एड्स पसरवण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी विशेष चौकशी समितीने एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. हा पोलीस अधिकारी हेब्बागोडी पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता.
पोलीस अधिकारी इयान रेड्डी भाजप आमदार मुनीरत्ना नायडू यांच्यासोबत मिळून विरोधी पक्षनेते आर. अशोक यांना एचआयव्ही संक्रिमित रक्ताने एचआव्हीची लागण करण्याचा कट रचत होते. पोलीस अधिकारी रेड्डी यापूर्वी पिन्या, राजगोपालनगर आणि यशवंतपूर पोलीस स्टेशमध्ये कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर पोलीस अधिकारी रेड्डी आणि आमदार मुनीरत्ना नायडू यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते.
भाजप मुनीरत्ना नायडू हे नेहमीच वादात राहिलेले आहेत. त्यांच्याविरोधात बलात्काराचाही आरोप करण्यात आला होता. पीडित महिलेने आरोप केला होता की रेड्डी आपल्या विरोधकांना हनी ट्रॅपमध्ये फसवतात. त्यासाठी एड्स झालेल्या महिलांचा वापर केला जातो. या प्रकरणी रेड्डी यांना ताब्यात घेतले होते. नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती.
माजी नगरसेवक वेलू नायकर यांनी साक्ष दिली होती की पोलीस अधिकारी रेड्डी आणि मुनिरत्ना यांनी एका तरुणाला पकडले. आणि या तरुणाला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचण्याची विनंती केली होती. नायकर आधी मुनीरत्नाचे सहकारी होता.