मतदारसंघाच्या विकासाऐवजी आमदारांनी दगडखाणी टाकून स्वतःचाच विकास केला, रवींद्र पाटील यांचे कारनामे उघड

पेण सुधागड मतदारसंघात रोजगार, पाणी, रस्ते असे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांनी मतदारसंघाचा विकास करण्याऐवजी पाच पाच दगड खाणी टाकून स्वतःचाच विकास केला. रवी पाटील यांचे सर्व कारनामे महाविकास आघाडीच्या पेण येथील सभेत उघड करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

नितीन बानुगडे पाटील यांनी विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या कारभाराची चिरफाड केली. ते म्हणाले, पेणचे उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटर आहे. लोकांना आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र रवींद्र पाटील यांनी विकासाच्या नावाने स्मशानभूमीवर खर्च केला. आरोग्य सुविधा व इतर सुविधा देऊन माणसे जगवायला पाहिजेत. परंतु भाजप आमदार त्यांच्या मरणाची सोय करीत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. भाजपचे आमदार अपयशी ठरले आहेत त्यामुळे नागरिकांनी प्रसाद भोईरसारखा उच्चशिक्षित, दूरदृष्टी असलेला, प्रशासनाची माहिती असलेला तरुण उमेदवार विधानसभेत निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, शेकापचे महादेव दिवेकर, सुभाष म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, दीपश्री पोटफोडे, स्मिता पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश पोरे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, दिनेश चिले, समीर शेडगे, विधानसभा सहसमन्वयक समीर म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख भगवान पाटील, लहू पाटील, शहरप्रमुख सुहास पाटील, माजी शहरप्रमुख प्रदीप वर्तक, राजेंद्र राऊत, योगेश पाटील, रोहिदास म्हात्रे, विभागप्रमुख राजू पाटील, नरेश सोनवणे, वसंत म्हात्रे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, राजश्री घरत, अच्युत पाटील, दिलीप पाटील, नंदू मोकल, चेतन मोकल, राजाराम पाटील, रवींद्र पाटील, गजानन मोकल, चंद्राहास म्हात्रे आदी उपस्थित होते.

42 गावांना फिल्टरचे पाणी

शिवसेनेने आंदोलन केल्यामुळेच जेएसडब्ल्यू कंपनी 42 गावांना पाणीपुरवठा करते. कंपनीला वठणीवर आणून या 42 गावांना फिल्टरचे पाणी द्यायला भाग पाडू, असा इशारा जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील यांनी दिला तर महायुतीचे नेते स्वार्थापोटी एकत्र आले आहेत. कार्यकर्त्यांचे बिघडलेले संबंध व तुटलेली घरे यांना दिसत नाहीत. याचमुळे मतदार महायुतीला नाकारतील, असा विश्वास जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी व्यक्त केला.