प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याची शुक्रवारी हैदराबाद येथे कॉन्सर्ट होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी तेलंगणा सरकारने दिलजीतला नोटीस जारी केले आहे. या नोटीसमध्ये तीन गाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तेलंगणा सरकारने ऑर्गनायझर टीम आणि हॉटेल नोव्होटेलला ही नोटीस बजावली आहे. कॉन्सर्टमध्ये ‘पटियाला पेग’, ‘पंज तारा’ आणि ‘केस’ गाण्यास मनाई करण्यात आली आहे.
दारु, ड्रग किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी गाणी वाजवू नये नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय लहान मंचावर आणू नये, आवाज खूप मोठा ठेवू नये असेही नमूद करण्यात आले आहे. दिलजीतच्या दिल्लीतील कॉन्सर्टमधील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने सावधगिरी बाळगत तेलंगणातील महिला आणि बालकल्याण तसेच अपंग आणि जेष्ठ नागरिक विभागाने ही नोटीस बजावली आहे.
अटी मान्य केल्या नाहीत तर कायदेशीर कारवाईचा इशारा तेलंगणा सरकारने दिला आहे. दिल्लीतून 26 ऑक्टोबर रोजी दिलजीतचा दौरा सुरू झाला असून 29 डिसेंबर रोजी गुवाहाटी येथे संपणार आहे.