चिरंतन चिंतन ; पंडित सी.आर. व्यास यांचा जीवनप्रवास उलगडला

पंडित सी.आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांचा सांगीतिक जीवनाचा प्रवास उलगडून दाखवणाऱया ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाले.

गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाउंडेशन (ग्रेस) आणि पंचम निषाद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गायक एम. वेंकटेश कुमार, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, शशी व्यास, सतीश व्यास, अनिल व्यास, पुस्तकाच्या लेखिका श्रृती पंडित, अच्युत पालव, श्रद्धा पालव, विनय गवांदे, हर्षल भटकळ, संगीतकार काwशल इनामदार आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘‘पंडित सी.आर. व्यास हे गायकांचे गायक होते. राग कसे गायचे, रागामध्ये भाव कसे आणायचे आणि शास्त्राrय गाण्यात शुद्धता कशी आणावी हे त्यांनीच शिकवलं. पंडितांच्या वागण्यात आणि गाण्यात दोन्हीत शुद्धता होती. पंडितजी हे गायक आणि नायक दोन्ही होते. त्यांच्यासारखे कलाकार खूप कमी आहेत,’’ अशा भावना एम. वेंकटेश कुमार यांनी व्यक्त केल्या. ‘‘सात वर्षांपासून आम्ही हा ग्रंथ तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय. बाबांनी साधेपणाने कसं जगायचं शिकवलं आणि येणाऱया पिढीला एक चांगला आदर्श घालून दिला,’’ अशा भावना शशी व्यास यांनी व्यक्त केल्या.

चरित्र ग्रंथामधील निवडक भागांचे अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि संगीतकार काwशल इनामदार यांनी अभिवाचन केले. या वेळी एम. वेंकटेश कुमार यांची गायन मैफील रंगली.