कॅरेबियन देश डॉमिनिकाने हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अॅवॉर्ड ऑफ ऑनर देण्याची घोषणा केली आहे. कोविड महामारीच्या काळात डॉमिनिकाला मदत केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे. डॉमिनिकाचे अध्यक्ष सिल्व्हनी बर्टन हे गयाना येथे भारत- पॅरिकॉम शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करणार आहेत. मोदी 19 ते 21 नोव्हेंबदर या कालावधीत गयाना दौऱयावर जाणार आहेत.