ट्रम्प यांनी दिले संविधान बदलाचे संकेत, तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संविधानात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आपण तिस्रयांदा राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी तयार आहोत परंतु, जोपर्यंत तुम्ही बोलत नाहीत की ट्रम्प चांगलेच आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे तोपर्यंत मी निवडणूक रिंगणात उतरणार नाही, अशा भावना ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. अमेरिकेत दोन वेळा राष्ट्राध्यक्ष बनण्याची राज्यघटनेत तरतूद आहे. त्यामुळे तिस्रयांदा राष्ट्राध्यक्ष बनायचे असेल तर राज्यघटनेत तसे बदल करावे लागतील.

गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी तुलसी गबार्ड

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक पदाची जबाबदारी हिंदुस्थानी वंशाच्या तुलसी गबार्ड यांच्यावर सोपवली आहे. बुधवारी त्यांनी याबाबतची घोषणा केली.

ट्रम्प यांच्या विजयाने चिडून वडिलांची हत्या

ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा होताच अस्वस्थ झालेल्या ब्यूर्क नावाच्या तरुणीने 67 वर्षीय वडिलांची बर्फ तोडण्याच्या चाकूने भोसकून हत्या केली. ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा होताच ब्यूर्क अस्वस्थ झाली. तिने रागाने वडिलांना सर्व दिवे बंद करण्यास सांगितले; परंतु त्यांनी नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.