महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दलाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाने प्रभावीत होऊन तसेच राज्याचा विकास करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष विजय पंडारे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. इंडिया आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय जनता दलाचा पाठिंबा असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव म्हस्के यांनी म्हटले आहे.
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014मध्ये जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. देशभरात भाजप सरकारने लोकशाही व राज्यघटना पायदळी तुडवून हुकूमशाही मार्गाने राज्यकारभार चालविला आहे. प्रादेशिक राजकीय पक्षांना ईडीच्या नावाखाली भयभित करून पह्डापह्डीचे राजकारण करणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी भाजप हटाव महाराष्ट्र बचाव ही भूमिका राष्ट्रीय जनता दल या पक्षाने अंगीकृत केली असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे.