20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी; चला, करूया मतदान, शाळा तीन दिवस बंद

राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर शिक्षक सहभागी आहेत. शिक्षकांच्या अभावी ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य होणार नाही, अशा शाळांना 18 ते 20 या काळात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी  सरकारी-निमसरकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय शिक्षकही या कामात गुंतले आहेत. त्यामुळे 18, 19, 20 नोव्हेंबर रोजी शाळा भरवणे शक्य नसेल तर शाळा बंद ठेवण्याच्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

आदेशात काय म्हटले आहे

विधानसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना जारी कराव्यात असे शालेय शिक्षण उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.