विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पर्वती विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला. सलग तीन टर्म आमदार असलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरुद्ध पक्षातील पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले. भाजप आमदार मिसाळ यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षातूनच सुरू झाली होती. स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपला पदाधिकाऱ्यांनीच आव्हान दिले. यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. हा अंतर्गत कलहच निवडणुकीत विद्यमान आमदारांचा घात करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अल्पदरात आरोग्य सेवा देणे, सरकारी दाखल्यांचे विनामूल्य वाटप आदी लोकसेवेचे व्रत सुरू ठेवलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांना मतदारसंघात जाहीर आणि छुप्या पद्धतीने मोठा पाठिंबा मिळत आहे. यामुळेच यंदा अश्विनी कदम यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर मानला जात आहे.
भाजपचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी पर्वतीतून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. मतदारसंघात या दोघांचे फ्लेक्स झळकत होते. यंदा उमेदवारी मिळविणारच आणि जिंकूनही येणार, असे पोस्टर्स लावलेल्या रिक्षा फिरत होत्या. भिमाले, शिळीमकर निवडणूक लढविण्यावर ठाम होते. माधुरी मिसाळ यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भिमाले, शिळीमकर यांनी नाराजी व्यक्त केली.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी नितीन कदम निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी ताकद अश्विनी कदम यांच्यामागे उभी आहे. काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी केली असली, तरी महाविकास आघाडीसमोर त्यांचा निभाव लागणार नाही. भाजपचेच माजी नगरसेवक भरत वैरागे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे बंड थोपविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. प्रत्येकाच्या घरी जाऊन महत्त्वाच्या पदांचे गाजर फडणवीस यांनी दाखविले. त्यामुळे बंडखोरांनी तलवार म्यान केली. मतदानाच्या दिवशी ही नाराजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. या नाराजीचा फायदा अश्विनी कदम यांना मिळेल.
अश्विनी कदम यांचे काम बोलतंय…
महानगरपालिकेच्या माध्यमातून कै. शिवशंकर पोटे दवाखान्याचे नूतनीकरण आणि संयुक्त प्रकल्प डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी अश्विनी नितीन कदम यांनी केली. गोरगरीब नागरिकांसह पुणेकरांना अत्यंत महागड्या एमआरआय, सिटीस्कॅन, डिजिटल एक्स- रे, सोनोग्राफी, कलर डॉफलर, टू डिको, डायगोनॉटिक सुविधा माफक व अल्प दरात मिळत असल्याने अश्विनी नितीन कदम आरोग्यदूत आहेत. महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकारी दाखल्यांचे विनामूल्य वाटप, आंबिल ओढ्याला पूर येऊन अरण्येश्वरनजीक या घटनेत सुमारे 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचे जनजीवन उद्ध्वस्त झाले. त्यावेळी कदम कुटुंबीयानी नागरिकांना शक्य तितकी मदत केली. भाजपने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीमा भिंतीच्या निविदेचे गाजर दाखवले. मात्र, आजही कदम यांचा आंबिल ओढ्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीत स्वतःचे कुटुंब संकटात असतानाही न थांबता नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम केले.
पूरग्रस्तांच्या मालकी हक्कासाठी योगदान
महायुतीच्या काळात पानशेत पूरग्रस्त 103 सोसायट्यांसाठी 2019 मध्ये शासननिर्णय काढला. या निर्णयाच्या अंबलबजावणीची मुदत 6 महिने होती. या शासन निर्णयात 1976 च्या रेडी रेकनरच्या रेटनुसार सोसायटी सभासदांकडून रक्कम घेऊन गाळेधारकास मालकी हक्क द्यावा, असा निर्णय घेण्यात आला; परंतु 1976 साली रेडीरेकनर अस्तित्वात नसल्यामुळे व आमदारांच्या निष्क्रियतेमुळे ही शासन प्रक्रिया पुढे गेली नसल्याचे बोलले जाते. 2019-21 या कोरोना महामारीनंतर स्थानिक नगरसेविका म्हणून अश्विनी नितीन कदम यांनी पाठपुरावा करून स्थानिक पानशेत पूरग्रस्त शिष्टमंडळाच्या मदतीने स्थानिक सोसायटींसाठी कलेक्टर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 1976 साली दिलेल्या भूखंडाच्या दराचे पुरावे दिले. शिवसेना पक्षप्रमुख, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाकडून 3 वर्षांची मुदतवाढ मंजूर करून घेतली. मुदतवाढ व दर निश्चितीमुळे पूरग्रस्त सोसायटीचे ठप्प झालेले काम चालू झाले. या योगदानामुळे कदम यांच्यावर मतदारांचा विश्वास वाढला आहे.
गद्दारांना सुट्टी नाही, शिक्षा झालीच पाहिजे; शरद पवार यांचा वळसे-पाटलांवर घणाघात