ऑल इंडिया एकता फोरमचा महाविकास आघाडीला पाठिंबा

ऑल इंडिया एकता पह्रमने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. मुस्लिम धर्मगुरू मौलाना खलील उररहमान सज्जाद नोमानी यांनी ही आज ही घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात मराठा आणि ओबीसी समाजातील 159, अनुसूचित जाती आणि जमातीमधील 53, इतर वर्गातील 40 उमेदवारांसह 23 उमेदवारांचा समावेश आहे, असे  मौलाना सज्जाद नोमानी यांनी सांगितले.

विविध संघटना व मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संविधानाला असलेला धोका तसेच इतर मुद्दे आम्ही विचारात घेतले आहेत, असेही नोमानी यांनी नमूद केले.