युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; प्रलंबित वेतनवाढ, न्यू पेन्शन स्कीम योजनेसह अन्य मागण्यांसाठी कार्यालयातच ठिय्या

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढ, न्यू पेन्शन स्कीम योजना व अन्य मागण्यांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स पंपनीच्या कर्मचाऱयांनी भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या नेतृत्वाखाली चर्चगेट येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स पंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयातच धरणे आंदोलन केले. या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अजय दळवी यांनी दिला.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कर्मचाऱयांची पगारवाढ गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. 14 टक्के न्यू पेन्शन स्कीम योजना आणि 30 टक्के फॅमिली पेन्शन योजना यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली विमा कर्मचारी सेनेचा पाठपुरावा प्रशासनाकडे सातत्याने सुरू आहे. या मागण्यांकरिता प्रशासनाला जाग आणण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स पंपनीच्या कर्मचाऱयांनी कार्यालयातच धरणे आंदोलन केले.

भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युनायटेड इंडियाचे अशोक रेडीज, न्यू इंडिया इन्शुरन्सचे अजय गोयजी, जीआयसीचे अंकुश कदम, नॅशनल इन्शुरन्सचे हेमंत सावंत, ओरिएन्जल इन्शुरन्सचे संजय शिर्पे, सचिन खानविलकर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदोलनाला कर्मचाऱयांचा मोठा प्रतिसाद लाभला. सभेचे सूत्रसंचालन  संजय चेवले यांनी केले.