चंदगडमध्ये मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे कन्नडमध्ये

महाराष्ट्रकर्नाटकचा सीमाप्रश्न मागील 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. अशातच चंदगडमध्ये संतापजनक प्रकार घडला. चंदगड मतदारसंघासाठीच्या टपाली मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे चक्क कन्नडमध्ये छापण्यात आली. त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय.

बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह कर्नाटकातील 865 गावे  महाराष्ट्रात समाविष्ट करावीत, अशी महाराष्ट्राची मागणी आहे. मात्र कर्नाटकचा याला तीव्र विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. तरीही कानडी सरकारने सीमावर्ती भागात कन्नडची सक्ती सुरूच ठेवली आहे. अशातच बेळगाव शहर चंदगडला लागून असल्याचे कारण देत चंदगड विधानसभेच्या मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे चक्क कन्नड भाषेत छापण्यात आली आहेत.