गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील पंधरागाव बौद्ध समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची चिपळूण येथे भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला.
भास्कर जाधव यांनी आजपर्यंत सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघाचा विकास करताना त्यांनी कधीही समाज, जात – पात, धर्म पाहिला नाही. सर्व समाजाला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली, हे आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. एवढेच नव्हे तर देशात भाजपचे सरकार आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलण्याचा प्रयत्न झाला. त्यावर विधानसभा असो वा राजकीय व्यासपीठ, प्रत्येक ठिकाणी आक्रमकपणे आवाज उठविण्याचे काम देखील त्यांनीच केले आणि अजूनही सातत्याने करत आहेत, हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते सुभाष मोहिते,पंधरागाव विभागातील तळवट पाल गावचे अजय गमरे, अनिल गमरे, संजय मोहिते, कावळे येथील शिवराज गमरे, विजय गमरे, साखर गावातील मुकेश कदम, पोसरे खुर्द येथील शाम मोहिते, सापिर्ली येथील सिताराम जाधव, पोसरे गावातील अशोक मोहिते, शांताराम चिखलकर, मंगेश गाडे, कुरवळ येथील शांताराम पवार, वावे गावातील समीर सकपाळ, अविनाश पवार, तळवट जावळी गावचे बौद्ध समाजाचे अध्यक्ष संजय तांबे, अनिल तांबे, कासई गावातील शंकर तांबे, धामणंद येथील महेंद्र जाधव, विश्वास तांबे, मुसाडमधील गंगाराम सावंत चोरवणेतील राष्ट्रपाल जाधव यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.