देशातील सामान्य नागरिक रोज सायबर फसवणुला बळी पडत आहेत. याबाबतच्या रोज नवीन तक्रारी समोर येत आहेत. या फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. आजकाल सेल्फी काढणे हा देखील सायबर फसवणूचा एक भाग झाला आहे. प्रत्येकाला आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतात. पण तुमची ही सवय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. वास्तविक, सायबर गुन्हेगार आता सेल्फी वापरून तुमची वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती प्राप्त करू शकतात.
सध्या कोणत्याही ॲप्स किंवा वेबसाईटवर लॉगइन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी सेल्फी घेण्यास सांगितले जाते. याला सेल्फी ऑथेंटिकेशन म्हणतात. यावरून तुमची ओळख सिद्ध केली जाते. बहुतेक बँका आणि फिनटेक कंपन्या सेल्फीद्वारे लोकांची पडताळणी करतात. मात्र, याच तंत्राचा वापर सायबर गुन्हेगारही करू शकतात, ज्याद्वारे ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
सेल्फी आणि सायबर फसवणूक
बँक फसवणूक: सायबर गुन्हेगार तुमच्या सेल्फीचा वापर करून तुमचे बँक खाते हॅक करुन तुमचे पैसे काढून घेऊ शकतात.
कर्ज फसवणूक : हॅकर्स तुमच्या सेल्फीचा वापर करून तुमच्या नकळत तुमच्या नावावर कर्ज घेऊ शकतात.
सिमकार्डचे क्लोनिंग : तुमच्या सेल्फीच्या मदतीने सायबर गुन्हेगार तुमचे सिमकार्ड क्लोन करू शकतात, ज्यावरून ते तुमच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी मिळवू शकतात.
सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय उपाययोजना कराल –
कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका
मजबूत पासवर्ड वापरा: तुमच्या सर्व खात्यांसाठी योग्य आणि मजबूत पासवर्ड तयार करा.
टू फॅक्टरऑथेंटीकेशन : सुरक्षा वाढवण्यासाठी टू फॅक्टरऑथेंटीकेशन वापरा.
अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा: चांगल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरसह तुमच्या फोनला मालवेअरपासून सुरक्षित करा.
सोशल मीडियावर सावध राहा: सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा.