रत्नागिरी जिल्ह्यातील 85 वर्षांपुढील 3583 आणि 592 दिव्यांग मतदार; गुरुवारपासून गृहमतदानाला होणार सुरुवात

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गुरुवारपासून (दि. 14 ते 17 नोव्हेंबर) घरातून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाचही विधानसभा मतदार संघात तशी सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली आहे. जिल्ह्यातील 85 वर्षापुढील 3 हजार 583 मतदार आणि 592 दिव्यांग मतदारांचे उद्यापासून घरातून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय 85 वर्षापुढील गृह मतदानासाठी पात्र मतदार पुढीलप्रमाणे-
263 दापोली – 817, 264 गुहागर – 768, 265 चिपळूण- 724, 266 रत्नागिरी – 661 आणि 267 राजापूर – 613 अशी एकूण 3583 मतदार.

विधानसभा मतदार संघनिहाय गृहमतदानासाठी पात्र दिव्यांग मतदार पुढीलप्रमाणे-
263 दापोली – 113, 264 गुहागर – 136, 265 चिपळूण- 111, 266 रत्नागिरी – 126 आणि 267 राजापूर – 106 अशी एकूण 592 इतके मतदार.