माझ्या नवरा स्वईच्छेने दुसरं लग्न करू शकतो, पैसा असेल तर 4 लग्नही मान्य! अभिनेत्रीच्या वक्तव्यावने खळबळ

पाकिस्तानी चित्रपटातील एका अभिनेत्रीने लग्नसंबंधाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या हीरा सुमन असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. हीराने जर एखाद्या पुरुषाकडे पैसा असेल आणि तो आपल्या पत्नीला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या आनंदी ठेवू शकतो, तर तो 4 लग्न करू शकतो. असे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हीरा पाकिस्तानी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. हीराने अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. दरम्यान अभिनेत्रीने एका मुलाखतीत लग्नसंबंधांवर वादग्रस्त विधान केलं. अभिनेत्रीला जर तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर तुला दुख: होणार नाही का ? असा प्रश्न विचारण्यात यावर तिने जर एखाद्या पुरुषाकडे पैसा असेल तर तो चार लग्न करू शकतो असे ती म्हणाली.
मला का दुख: होईल. मला हे समजत नाही. जर एखादा माणूस  प्रत्येक काम चांगल्या रीतीने करत असेल. जर त्याच्यात चांगली वागणूक असेल तर काही हरकत नाही. कोणत्याही गोष्टीत तुमचा हेतू महत्त्वाचा असतो. जर तुमचा हेतू योग्य असेल तर तुम्ही चार वेळा लग्न करू शकता, काही हरकत नाही. असे ती म्हणाली. त्यानंतर अभिनेत्रीने स्पष्ट केले की आपल्या समाजात असे अनेक पुरुष आहेत जे आपल्या पत्नीशी प्रामाणिक नाहीत. बाहेर जाऊन चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा लग्न केलेले बरे. असे स्पष्ट मत हीराने व्यक्त केले. हिरा सुमरूला तिच्या वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे.