हिंदुस्थानी वंशांची अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या काही दिवसांपासून तिच्या आरोग्यामुळे चर्चेत आली असून चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान तिने स्वत: तिच्या आरोग्याबाबत दिलासादायक अपडेट दिली आहे. तिची तब्येत ठिक असून तिचा तसा फोटो येण्यामागचे कारणही सांगितले आहे.
सुनीता विल्यम्सचा नुकताच एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये सुनीता अशक्त दिसत होती. यानंतर, नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनला निवेदन जारी करावे लागले. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुनीताने तिच्या स्वास्थ्याबाबत फ्लुएड शिफ्टस सांगितले आहे. शिवाय त्यांनी तिची तब्येत बरी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी न्यू इंग्लंड स्पोर्ट्स नेटवर्कच्या क्लबहाऊस किड्स शोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, तुम्हाला माहिती आहे का अंतराळात आमचे डोके थोडे मोठे दिसू लागते. कारण द्रव शरीरावर अधिक समान रीतीने पसरतात. सुनीता विल्यम्सने सांगितले की, ती पूर्वीसारखीच निरोगी आहे आणि अशक्त झाल्याचा दावाही तिने फेटाळला आहे. उलट बराच वेळ अंतराळात राहिल्यानंतर वजन वाढल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, ‘माझ्या मांड्या थोड्या वाढल्या आहेत, ‘आम्ही खूप स्क्वॉट्स करतो.’
नासाचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी एक निवेदन जारी केले होते, नासाच्या सर्व अंतराळवीरांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते, त्यांच्याकडे फ्लाइट सर्जन असतात जे त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि त्या सर्वांची तब्येत चांगली आहे.सुनिता विल्यम्सच्या मोहिमेत थेट सहभागी असलेल्या नासाच्या एका कर्मचाऱ्याने असा दावा केला की अंतराळवीरांचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.