सलमान खान, शाहरुख खाननंतर आता ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती चर्चेत आले आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पाकिस्तानी गॅंगस्टरकडून धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने ही धमकी दिली आहे. मिथुन यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर 15 दिवसांच्या आत माफी मागायला सांगितली आहे. हेही सांगण्यात आले आहे की असे न झाल्यास त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल. मिथुन यांना ही धमकी दुबई येथून मिळाली आहे. पाकिस्तानी गँगस्टरचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये मिथुन यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर ही धमकी देण्यात आली आहे.