देशाची सत्ता गेल्या दहा वर्षांपासून मोदी यांच्या हातात आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही काय केले? शरद पवारांनी एवढेच केले, तुमचा सत्तेचा उन्माद उतरवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, असा घणाघात करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी-शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱयावर आहेत. धुळे जिह्यातील शिंदखेडा येथे जाहीर सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत. खरे तर त्यांनी दहा वर्षांचा हिशोब दिला पाहिजे.
पेंद्रात गेल्या दहा वर्षांपासून मोदींची सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले? आज देशातील शेतकरी चिंतेत आहे. महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. पेंद्रात आमचे सरकार असताना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. देशातील शेतकऱयांचे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी कर्जमाफीचा प्रस्ताव आणून 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र मोदी ते करत नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सोबत घेत सरकार स्थापन केले. काय केले सरकार स्थापन करून? कोणते निर्णय घेतले? काय अवस्था आहे देशातल्या शेतकऱयांची, देशातील तरुणांची आणि भगिनींची?
योजनांपेक्षा महिलांना सुरक्षा द्या
एकीकडे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांत 900 महिलांवर अत्याचार झाले आणि सरकार म्हणते, आम्ही लाडकी बहीण योजना आणली. महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा तिला सुरक्षा द्या, असे खडेबोल शरद पवार यांनी मिंधे आणि पेंद्रातील भाजप सरकारला सुनावले.