विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात 16 मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या 21 बंडखोरांना काँग्रेसने आज पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या सूचनेवरून आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
कोपरी पाचपाखाडी – मनोज शिंदे आणि सुरेश पाटीलखेडे, राजापूर – अविनाश लाड, रामटेक – राजेंद्र मुळक, यवतमाळ – शबीर खान, उमरखेड – विजय खडसे, आरमोरी विधानसभा मतदारसंघ – आनंदराव गेडाम आणि शिलु चिमुरकर, गडचिरोली – सोनल कोवे आणि भरत येरमे, बल्लारपूर – अभिलाषा गावतुरे आणि राजू झोडे, भंडारा – प्रेमसागर गणवीर, अर्जुनी मोरगाव – अजय लांजेवार, भिवंडी – विलास पाटील आणि आसमा जव्वाद चिखलेकर, मीरा भाईंदर – हंसकुमार पांडे, कसबा पेठ – कमल व्यवहारे, पलूस कडेगाव – मोहनराव दांडेकर, नगर शहर – मंगल विलास भुजबळ यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.