मुंबई मिळवण्यासाठी गिरणी कामगारांनी, श्रमिकांनी रक्त सांडले; श्रमिक महासंघाच्या मागण्यांना अजय चौधरी यांचा पाठिंबा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रकाशचे उमेदवार अजय चौधरी यांनी 183-शिवडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र हायस्कूल मैदान येथे सर्व श्रमिक संघटना संलग्न महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ यांच्या आंदोलनात सहभागी होऊन, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. या भेटीदरम्यान आंदोलकांशी त्यांनी संवाद साधला. गिरणी कामगारांनी मुंबईसाठी दिलेल्या बलिदानची आठवण झाली, असं ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी गिरणी कामगारांनी, श्रमिकांनी रक्त सांडले आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे. त्यामुळे त्यांना हक्काचे घर मुंबईतच मिळायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच त्यांच्यासमोर गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी शिवसेनेने केलेल्या संघर्षाची देखील आठवण करून दिली आणि तसेच त्यांच्या हक्कासाठी यापुढेही मी अजय चौधरी पूर्ण ताकदीने लढा देण्याचे आश्वासन दिले.

गिरणी कामगार, कष्टकऱ्यांनी आपल्या कष्टातून या शहराच्या उभारणीस हातभार लावला आहे. त्यांच्या त्यागाला योग्य न्याय मिळावा, त्यांना त्यांच्या हक्कांची घरे मिळावी, यासाठी मी अजय चौधरी शिवडी विधानसभा पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे, असा शब्द आंदोलकांना दिला. यावेळी उदय भट, विजय कुलकर्णी, मिलिंद रानडे, ॲडव्होकेट निंबाळकर, हेमंत गोसावी, दत्तात्रय आत्याळकर, बी. के. आंब्रे उपस्थित होते.