ईडीपासून सुटका मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो असे विधान छगन भुजबळ यांनी केले होते. त्यामुळे अजित पवार गट विकासासाठी भाजपसोबत गेलेच नव्हते असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.
ईडीपासून सुटका मिळाल्यानंत माझा पुर्नजन्म झाला अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पत्रकार लेखक राजदीप सरदेसाई यांना दिली होती. सरदेसाई यांनी 2024 Election That Surprised India या पुस्तकात ही प्रतिक्रिया लिहिली आहे.
या बातमीचा आधार घेत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, भुजबळ साहेबांच्या वक्तव्यातून, विकासासाठी भाजपसोबत कोणीही गेलं नाही आणि ईडीचं बेकायदेशीर भूत मानगुटीवर बसवून महाराष्ट्र नासवण्याचं, मराठी अस्मिता चिरडण्याचं काम झालं, या दोन बाबी स्पष्ट होतात.
महाराष्ट्र अस्थिर करून महाराष्ट्राचं आर्थिक सत्ताकेंद्र गुजरातला शिफ्ट करण्याची गुजरातच्या दिल्लीतल्या नेत्यांची योजना महाराष्ट्रातील आधुनिक अनाजी पंतानी पूर्णत्वास नेली. आता महाराष्ट्राने या आधुनिक अनाजी पंताला ओळखलं असून त्यांचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असेही रोहित पवार म्हणाले.
भुजबळ साहेबांच्या वक्तव्यातून, विकासासाठी भाजपसोबत कोणीही गेलं नाही आणि इडीचं बेकायदेशीर भूत मानगुटीवर बसवून महाराष्ट्र नासवण्याचं, मराठी अस्मिता चिरडण्याचं काम झालं, या दोन बाबी स्पष्ट होतात.
महाराष्ट्र अस्थिर करून महाराष्ट्राचं आर्थिक सत्ताकेंद्र गुजरातला शिफ्ट करण्याची… pic.twitter.com/J2P3LpkSxg
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 8, 2024