शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर

मुंबईतील सभेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे खासदार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित प्रसिद्ध करण्यात आला. त्याच्या दुसऱयाच दिवशी शरद पवार हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱयावर पोहोचले आहेत. नागपूर, तिरोडा गोंदिया, काटोल आणि अमरावती जिह्यात त्यांच्या सभा होणार आहेत. पवार हे हिंगणघाट भागातही जाणार आहेत. जनतेला बदल हवा आहे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आम्हाला करावे लागेल, असे शरद पवार या वेळी म्हणाले. जातनिहाय जनगणना व्हावी ही माझी तीन वर्षांपूर्वीची मागणी आहे, ती झालीच पाहिजे. जातनिहाय जनगणनेनंतर देशातील सामाजिक वास्तव समोर येईल असेही ते म्हणाले.