भारतीय जनता पक्षाचा नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास विरोध होत होता. तरीही मलिक अणुशक्तीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजित पवार गटाकडून ते निवडणूक लढवत आहेत. आता अजित पवार यांनीही भाजपला ठेंगा दाखवत नवाब मलिक यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाब मलिक हे काही महिने तुरुंगातही होते. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्या अजित पवार गटाला पाठींबा दिला. विशेष म्हणजे भाजपचा विरोध डावलून अजित पवार गटाने त्यांना एबी फॉर्म देत निवडणुकीच्या रिंगणातही उतरवले. आता अजित पवार त्यांचा प्रचारही करणार आहेत.
अजित पवार महायुतीची साथ सोडणार? नवाब मलिक यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
नवाब मलिक यांना आम्हीच उमेदवारीद दिली असून त्यांच्या प्रचारालाही जाणार. अद्याप त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाही. आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही गोष्टी कशा ठरवता, असा प्रतिसवालच अजित पवार यांनी केला.
View this post on Instagram