मिस्टर आशिष शेलार, मग कधी घेताय संन्यास? अंबादास दानवेंचा चिमटा

लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला 18 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकीय संन्यास घेईन असे विधान भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले होते. प्रत्यक्षात निवडणूकीनंतर महाविकास आघाडाली महाराष्ट्रात 30 जागा मिळाल्या तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. मात्र त्यानंतर आता सहा महिन्यांचा काळ लोटला तरी अद्याप आशिष शेलारांनी संन्यास घेतलेला नाही. त्यावरून विधानपरिषेदतील विरोधी पक्षनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आशिष शेलारांना चिमटा काढला आहे.

लोकसभेच्या वेळी आशिष शेलार यांनी केलेल्या त्या वक्तव्याची बातमी ट्विटरवर शेअर करत दानवे यांनी त्यांना चिमटा काढला आहे. ”मिस्टर आशिष शेलार जस्ट आठवण! कधी सोडताय सगळं मग..? असे दानवे यांनी ट्विट केले आहे.