तीन वर्षाच्या मुलीला कारमध्ये लॉक करुन दारू प्यायला गेला, गुदमरल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू

तीन वर्षाच्या मुलीला कारमध्ये लॉक केल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

नरेश नामक व्यक्ती शेजारी राहणाऱ्या मुलीला कारमधून फिरायला घेऊन गेला होता. वाटेत दारुचे दुकान पाहून तो मुलीला कारमध्ये लॉक करून दारु प्यायला गेला. काही तासांनंतर त्याला तो जेव्हा परत आली तेव्हा मुलीची कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता.

मयत मुलीचे वडील आणि आरोपी नरेश दोघेही लष्करात आहे. आरोपी नरेश घरच्यांना न सांगता मुलीला कारमध्ये फिरायला घेऊन गेला होता. घराबाहेर खेळत असणारी मुलगी अचानक गायब झाल्याने तिची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी मुलगी नरेशच्या कारमध्ये मृतावस्थेत सापडली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे.