लाइट मोटर व्हेईकल (LMV) लायसन्सधारक 7500 किलो वजनाची वाहने चालवू शकतात, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. वाढत्या रस्ते अपघातांना एलएमव्ही लायसन्सधारक जबाबदार असल्याचे सिद्ध करणारा कोणताही डेटा नाही, असे सांगत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. एलएमव्ही लायसन्सधारकांच्या उदरनिर्वाहाशी संबंधित हा मुद्दा आहे. कायद्यातील दुरुस्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे न्यायालयाने केंद्राला सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विमा कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले होती. सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित 18 जुलै 2023 रोजी एकूण 76 याचिकांवर सुनावणी सुरू केली.
मोटार अपघात दावा न्यायाधिकरण आणि न्यायालये एलएमव्ही लायसन्सबातच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत विम्याचे दावे देण्याचे आदेश देत असल्याचा आरोप विमा कंपन्यांनी केला आहे.