अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील वॉन्टेड आरोपी अनमोल बिष्णोईची व्हॉईस सँपल घेण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोलचा सहभाग आहे का हे शोधण्यासाठी मुंबई न्यायालयाने शूटर विकी कुमार गुप्ता आणि वाँटेड आरोपी अनमोल बिष्णोई यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची (पेन-ड्राइव्हमधील) सॉफ्ट कॉपी प्रदान करण्याचे निर्देश डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅब (DFSL) ला दिले आहेत.
डीसीबी सीआयडीचे सहायक पोलीस आयुक्त किशोर कुमार शिंदे यांच्याकडे DFSL पेन ड्राईव्हमध्ये ऑडिओ क्लिप देईल आणि एक प्रत स्वतःकडे ठेवेल, असे न्यायालय म्हणाले. विशेष न्यायाधीश बीडी शेळके यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या अर्जावर आदेश देताना हे निर्देश दिले.