American president election – डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरीस, कोण मारणार बाजी? मू डेंगने वर्तवली भविष्यवाणी

अमेरिकेमध्ये आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरीस आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यामध्ये मुख्य लढत रंगली आहे. निवडणूक कोण जिंकणार यावरून अनेत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच थायलंडच्या प्राणी संग्रहालयातील मू डेंग या पाणगेंड्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची भविष्यवाणी वर्तवली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

पूर्व थायलंडमध्ये चोनबुरी येथे खाओ खेवो हे प्राणी संग्रहायल आहे. या संग्रहायलामध्ये मू डेंग नावाचा पाणगेंडा आहे. दरम्यान, सोमवारी (4 नोव्हेंबर 2024) प्राणी संग्रहालयात एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगानुसार, मू डेंगला पाण्याबाहेर बोलवण्यात आले व त्याच्या समोर दोन टरबूजांता पर्याय ठेवण्यात आला. एका टरबूजावर डोनाल्ड ट्रम्प आणि दुसऱ्या टरबूजावर कमला हॅरिस यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मू डेंगने डोनाल्ड ट्रम्प नावाच्या टरबूजावर ताव मारला. याच वेळी दुसऱ्या पाणगेंड्याने कमला हॅरिस यांच्या नावाचा टरबूज खाण्याला पसंती दिली.

सोशल मीडियावर सदर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत वेगवेगळ्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. गरूवारी निकाल जाहीर होणार असून त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.