Olympics 2036 – ऑलिम्पिक सुद्धा गुजरातलाच, हिंदुस्थान करणार आयोजन? IOA ने दावेदारी केली जाहीर

Indian Olympics Association ने पुढचं पाऊल टाकत 2036 मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी दावेदारी ठोकली आहे. तशा आशयाचं पत्र IOA ने International Olympics Association ला पाठवले आहे. हिंदुस्थानकडून अहमदाबाद शहाराचं नाव आयोजनासाठी जाहीर करण्यात आले आहे.

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, IOA ने 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनला पत्र पाठवत 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे. हिंदुस्थानसह अन्य 10 देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने हिंदुस्थान (अहमदाबाद), मॅक्सिको (मॅक्सिको शहर आणि ग्वाडालजारा-मॉन्टेरी-गुयना), इंडोनेशिया (नुसानतारा), तुर्की (इस्तंबूल), पोलंड (वारसा आणि क्राकोवा), इजिप्त आणि दक्षिण कोरिया (सोल-इंन्चॉन) या देशांचा समावेश आहे.

हिंदुस्थानने एकदाही ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले नाही. हिंदुस्थानने आतापर्यंत फक्त Asian Games चे 1951 आणि 1982 साली आयोजन केले होते. तसेच 2010 साली दिल्लीमध्ये Commonwealth Games चे आयोजन केले होते.