जालन्यातील मौजे बाजी उम्रद येथील शेतात गांजाची शेती करण्यात येत होती. त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. त्या ठिकाणाहून 20 लाख रुपयांचा मुद्देमाल गांजासह जप्त करत शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती काढत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देत मार्गदर्शन केले होते. गुप्त बातमीदाराकडून सोमवारी माहिती मिळाली की, मौजे बाजी उम्रद शिवारामधील शेतामध्ये बद्री पवार (रा. बाजी उम्रद, ता.जि. जालना) त्याच्या शेतामध्ये गांजाची शेती करत गांजा विक्री करत आहे. मिळालेल्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व मौजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी मौजे बाजी उम्रद, ता.जि. जालना येथे बद्री पवार याच्या शेतावर छापा मारत त्याच्या गट क्र.433, बाजी उम्रद शिवारामधील शेतामध्ये पाहणी केली असता बद्री पवार हा त्याचे स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये गांजाचे एकुण 30 झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करीत असताना आढळला.
सदर गांजाची 30 झाडांचे पंचासमक्ष वजन केले असता ते 80 किलो 415 ग्रॅम असुन किंमत अंदाजे 20 लाख 10 हजार 375 रुपये किंमतीचा असल्याचे दिसुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मौजपुरीपोलीस ठाण्यात बद्री लक्ष्मण पवार, रा.बाजीउम्रद, ता.जि. जालना याचेविरुध्द एन.डी.पी.एस. कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, परतुर दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, मौजपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, स्था.गु.शाचे अधिकारी सपोनि योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, संजय राऊत व सोबत स्थागुशाचे अमंलदार, रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सतिश श्रीवास, ईरशाद पटेल, आक्रुर धांडगे, गणेश वाघ तसेच मौजपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार संजय राऊत, दादा हरणे, पंकज बाजड, नितीन खरात, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, प्रदीप पाचरणे, धोंडीराम वाघमारे इत्यादींनी केली आहे.