आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. आयपीएस संजय वर्मा हे 1990 बॅचचे अधिकारी असून एप्रिल 2028 पर्यंत ते पोलीस महासंचालक पदावर कार्यरत राहणार आहेत. सध्या डीजी लीगल आणि टेक्निकल या पदावर कार्यरत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दट्ट्यानंतर राज्य सरकारने वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पदावरून उचलबांगडी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांना हटवल्यानंतर विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. त्यानंतर आज संजय वर्मा यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली.
Sanjay Kumar Verma, IPS (MH:1990) to be the new DGP of Maharashtra. pic.twitter.com/wvRoMAjqsi
— ANI (@ANI) November 5, 2024
रश्मी शुक्ला यांच्यानंतर पोलीस महासंचालकपदासाठी तीन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. राज्य सरकारने या पदासाठी तीन नावांची शिफारस केली होती. त्यात रितेश कुमार, संजय वर्मा आणि विवेक फणसाळकर यांच्या नावाचा समावेश होता. यापैकी संजय वर्मा यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.