राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभेत अनेक लक्षवेधी लढती होणार असून यापैकीच एक लढत बारामती मतदारसंघात अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात होणार आहे. लोकसभेला येथून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले असून मतदारांना ते भावनिक सादही घालताना दिसत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते लाडक्या बहिणींचे पैसे परत घेऊ असे म्हणत धमक्या देत असल्याचे समोर आले आहे.
लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला करा! अजित पवार यांची बारामतीकरांना भावनिक साद
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली. याच लाडक्या बहिणींना मतांसाठी धमक्या देण्याचा प्रकार सुरू आहे. बारामतीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेल्या महिलांचे फोटो काढत असून मतदान न केल्यास पैसे परत घेऊ अशी धमकी देत आहेत, असा आरोप एका व्यक्तीने माध्यमांशी बोलताना ढसाढसा रडताना केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मरीन पण तुतारीच वाजवीन! ♥️
अजित पवारांनी बारामतीचा नाद सोडवा आणि राज्यांत बाकी ठिकाणी लक्ष घालावं.
बारामतीला फक्त शरद पवार साहेब! pic.twitter.com/5g4ixVlXjQ
— Omkar Mali (@Omkara_Mali) November 5, 2024