पिंपरीत शिलवंत-बनसोडे यांच्यात सामना, चाबुकस्वार यांची माघार

पिंपरी मतदारसंघातून महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यात लढत होणार आहे. अपक्ष अर्ज दाखल केलेले | शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, रिपाइंच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह 21 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 15 उमेदवार रिंगणात आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या मध्यस्थीमुळे चाबुकस्वार यांनी अर्ज माघारी घेतला.

‘यांनी’ घेतली माघार

■ माजी आमदार गौतम चाबुकस्वार, चंद्रकांता सोनकांबळे, जितेंद्र ननावरे, काळूराम पवार, मयूर जाधव, रिता सोनवणे, बाबासाहेब कांबळे, दीपक रोकडे, सुरेश लोंढे, प्रल्हाद कांबळे, गौतम कुडूक, कृष्णा कुडूक, चंद्रकांत लोंढे, नवनाथ शिंदे, स्वप्नील कांबळे, मनोज कांबळे, दादाराव कांबळे, मुकुंद ओव्हाळ, जफर चौधरी, सुधीर कांबळे, हेमंत मोरे अशा २१ जणांनी माघार घेतली आहे.

‘हे’ आहेत निवडणूक रिंगणात

■ सुलक्षणा शिलवंत, अण्णा बनसोडे, सुंदर कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, मनोज गरबडे, राजेंद्र छाजछिडक, राहुल सोनवणे, कैलास खुडे, नरसिंग कटके, भिकाराम कांबळे, मीना खिलारे, राजू भालेराव, सचिन सोनवणे, सुधीर जगताप, सुरेश भिसे असे 15 उमेदवार रिंगणात आहेत.