ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी, अभिनेत्री हेलेना ल्यूक (68) यांचे रविवारी अमेरिकेत निधन झाले.
सत्तरच्या दशकात फॅशन जगतात हेलेना ल्यूक हे एक प्रसिद्ध नाव होते. 1979 मध्ये त्यांची मिथुन चक्रवर्तीसोबत भेट झाली आणि काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. केवळ चारच महिने त्यांचा संसार टिकला. हेलेना यांनी जुदाई या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मर्द, दो गुलाब, एक नया रिश्ता, साथ साथ आणि आओ प्यार करें यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. पुढे त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करायला सुरुवात केली.