Dapoli News: दापोलीत एकाच कुटुंबातील दोनजण बुडाले, गावावर शोककळा

drowned

दापोली येथे एक दुःखद घटना घडली आहे. येथील टेटवली येथे कोडजाई नदीत बुडून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आयुष चिनकटे (17) आणि सुजित घाणेकर (23), अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घडल्या घटनेने सडवे टेटवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील सडवे येथील सुजित घाणेकर आणि टेटवली येथील आयुष चिनकटे हे दोघे नातेवाईक आपल्या मित्रांसमवेत कोडजाई नदीपात्रात मासे पकडण्याकरिता गेलेले होते. मासे पकडून झाल्यानंतर ते पोहण्यासाठी कोडजाई नदीपात्रात उतरले.

Raosaheb Danve: मला अडचणीचे प्रश्न विचारू नका, महायुती निवडून येणार! स्वयंघोषित ‘शिवाजी’ रावसाहेब दानवे यांची लोणकढी थाप

मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी काठावर असलेल्या उर्वरित मुलांनी जोरजोरात आरडाओरडा केला. यावेळी कोडजाई नदी लगतच्या सडवे सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. यामध्ये आयुष चिनकटे व सुजित घाणेकर यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला

यानंतर ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. यामुळे ग्रामस्थांना दोन्हीही मृतदेह डमडममधून टाकून शिवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणली. ऐन दिवाळीच्या सणातच सदरची दुर्देवी घटना घडल्यामुळे सडवे व टेटवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील दोघांचे मृतदेश शवविच्छेदन करण्यासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणले असून रात्री उशिरापर्यंत दापोली पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.