बॉलीवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्युक यांचे रविवारी निधन झाले आहे. हेलेना यांच्या निधनाबाबत प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. त्यांचे निधन अमेरिकेत झाले आहे.
मीडिया वृत्तानुसार, हेलेना अमेरिकेत राहत होत्या आणि मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मात्र तरीही त्या डॉक्टरकडे गेल्या नाहीत. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोण होते, त्यांची देखभाल कोण करत होते याबाबत माहिती मिळालेली नाही. हेलेना ल्युक एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. मिळालेल्या माहितीनुसार, सारिका संग हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांची भेट हेलेना ल्युक हिच्याशी झाली. पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. ज्यावेळी मिथुन यांनी हेलेना यांच्याशी लग्न केले त्यावेळी मिथुन यांचे करिअरचा चांगला काळ सुरु होता. दोघांनी 1979 मध्ये लग्न केले आणि जवळपास 4 महिन्यातच त्यांना लग्न संसार मोडला. त्यानंतर मिथुन याने योगिता बाली हिच्यासोबत लग्न केले.
हेलेना ल्युक यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत 9 सिनेमांमध्ये काम केले. ती अमिताभ बच्चन यांचा हिट सिनेमा मर्द मध्ये दिसली होती. त्यात ती ब्रिटीश राणी च्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ‘भाई आखिर भाई होता है’, ‘ये नजदीकियां’, ‘रोमांस’, ‘साथ साथ’, ‘जुदाई’, ‘एक नया रिश्ता’, ‘आओ प्यार करें’ और ‘दो गुलाब’ या सिनामांमध्ये काम केले. तर इंडस्ट्री सोडल्यानंतर हेलेनाने डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडेंट च्या रुपात काम करत होती.