देशात विविध भूखंड मोदी सरकारने अदानींच्या घशात घातले. हिमालयही विकायला काढला असून येथेही अदानींना बिझनेस सेट करून दिला जाणार आहे. आता अदानींनी मोदी कृपेने बांगलादेशातही हातपाय पसरल्याचे समोर आले आहे. बांगलादेशात अदानी वीजपुरवठा करत असून येथील आर्थिक मागासलेपणाचा फटका अदानींना बसल्याचे उघड झाले आहे. बांगलादेशकडे अदानींच्या वीजपुरवठ्यापोटी तब्बल 7 हजार 118 कोटी रुपयांची थकबाकी असून चार दिवसांत थकबाकी दिली नाही तर बांगलादेश सरकारला वीजपुरवठा करणार नाही, असा इशारा अदानी समूहाने दिला आहे.
अदानीने शुल्क वाढवल्याचा बांगलादेशचा दावा
अदानी समूहाने वीजपुरवठ्यासाठीचे शुल्क वाढवले असून दर आठवड्याला 22 मिलियन डॉलरहून अधिक शुल्क आकारले जात आहे. त्यामुळेच थकबाकी वाढत असल्याचे बांगलादेश इलेक्ट्रिसिटी बोर्डाने म्हटले आहे. तसेच आम्ही जुनी थकबाकी चुकती केल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, अदानी समूह 22 मिलियन डॉलरहून अधिक शुल्क आकारत आहे तर बांगलादेश इलेक्ट्रिसिटी बोर्ड 18 मिलियन डॉलर देत आहे, त्यामुळेच थकबाकी वाढत असल्याचे चित्र आहे.