कानपूरमध्ये दिवाळीच्या सणाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. दिवाळीनिमित्त फटाके फोडत असताना सुतळी बॉम्बच्या स्फोटात एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत मुलाच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून घटनेला जबाबदार असलेल्या काही संशयित लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय घडलं नेमकं?
सुतळी बॉम्बवर ग्लास ठेवून बॉम्ब फोडला. बॉम्बचा फुटताच ग्लासचे तुकडे झाले. हे तुकडे मुलाच्या अंगावर उडून मुलगा गंभीर जखमी झाला. मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
फॉरेन्सिक टीमने ग्लासचे तुकडे गोळा करून तपासासाठी पाठवले आहेत. पोलीस संशयित लोकांची कसून चौकशी करत आहेत.