स्वच्छ राजकारणी नेत्याबद्दल त्यांच्या पश्चात उलटी-सुलटी चर्चा होणं अशोभनीय; अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर काही दिवसांपुर्वी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला, असे वक्तव्यही अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या वक्तव्याबाबत अनेक नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी याबाबत प्रतिक्रिया देत हे अशोभनीय असल्याचे म्हटले आहे.

सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही कोणी केलेला नव्हता. हा मुद्दा कोणी काढला हे सांगायची गरज नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ व्यक्तीमत्व म्हणून ज्यांचं नावलौकीक होता. अशा स्वच्छ राजकारणी नेत्याबद्दल त्यांच्या पश्चात्य अशी वक्तव्ये करणे अशोभनीय आहे. हे घडलं नसतं तर आंनद झाला असता. या करण्यात आलेल्या वक्तव्याबाबत खंत वाटत असल्याचेही ते म्हणाले.

जी व्यक्ती जाऊन नऊ नर्ष झाली आणि त्यांचा लौकिक संपुर्ण देशामध्ये एक अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक नेता असा होता. त्यांच्यासंबधी अशी चर्चा होणं हे योग्य नाही. सत्ता हातात असल्यानंतर आपण काहीही बोलायला मुक्त आहोत. हा समज काही लोकांचा असतो. कदाचित त्याचाच हा एक भाग असेल, असे म्हणत कोणाचेही नाव न घेता शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांची बोलती बंद केली आहे.