राजस्थानमधील मावा बनवणाऱ्या फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या स्फोटात फॅक्टरीतील दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भिलवाडा जिल्ह्यातील नारायणपूर गावात ही घटना घडली. महादेव गुर्जर आणि राधेश्याम गुर्जर अशी मयतांची नावे आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त अन्य कामगार सुट्टीवर गेले होते. त्यामुळे घटनेवेळी फॅक्टरीत केवळ दोघे मयत उपस्थित होते. दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे ऐन सणासुदीत कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बॉयलरचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.