राष्ट्रीय टेनिस स्पर्धा आजपासून

ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षांखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातून मुले व मुली दोन्ही गटांत 198 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून, ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगरमधील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स येथे 2 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. स्पर्धेत मुलींच्या गटात कर्नाटकच्या सृष्टी किरण हिला, तर मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आराध्य म्हसदे याला अक्कल मानांकन देण्यात आले आहे. एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, एमएसएलटीएच्या कतीने 14 खालील गटात राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपली गुणकत्ता सिद्ध करण्याची आणखी संधी मिळेल. मराठवाड्यात अधिकाधिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये टेनिसचा होत असलेला प्रसार बघून आम्हाला खूप आनंद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 14 वर्षांखालील एआयटीए टेनिस स्पर्धा, 16 वर्षांखालील गटातील आशियाई मानांकन टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.