पिवळी साडी, जांभळा ब्लाऊज नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, केसात गजरा, हातातील बांगड्या या मराठमोळ्या लूकने नृत्यांगना गौतमी पाटीलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गौतमी सातत्याने तिचे फोटो, व्हिडोओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने दिवाळीनिमित्त पारंपारिक लूकमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड सुदंर दिसत आहे. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर भरभरुन कॉमेण्ट्स केल्या आहेत. या फोटोंसह तिने या दिवाळीत देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रेम, सुख-समृद्धीचा दीप प्रज्वलित करो. तुमच्या जीवनातील आनंद अफाट राहो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा अशी फोटोओळही देत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.