वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी सांगितले. बुधवारी रात्री आंबेडकर यांच्या छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजीओग्राफी करण्यात येणार आहे.